बार्शिटाकळी-येथील गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला . दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखा व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आला, या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील बहुसंख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन व स्वागतांनी झाली. या कार्यक्रमासाठी खंडेलवाल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ मिलिंद शिरभाते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या भाषणात सध्याच्या काळातील पर्यावरणाचा होणारा ह्रास यावर चिंता व्यक्त करून त्याचे संवर्धन कसे करता येईल येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. .त्यानंतर कार्यक्रमाचे कार्यकारी सचिव रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए बी पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व पाहुण्यांचा परिचय देऊन कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.मंचावर उपस्थित असलेले, कार्यक्रमाचे समन्वयक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ संतोष सुरडकर, यांनी महिलांचे विज्ञानातील योगदान यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालयातील विद्यार्थिनींना विज्ञानाबद्दल प्रोत्साहित केले, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकरराव पवार उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व विशद केले व विज्ञान विद्याशाखेचे कौतुकही केले. तसेच या दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा व विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशाप्रकारचे गुलाम नबी आझाद महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.डॉ. एन एम कंकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. जैन मॅडम तर आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागाचे डॉ.एस.ए.वाघमारे यांनी केले. |