बार्शिटाकळी येथील गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला . दि. 03 मार्च 2020 रोजी महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखा व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आला, या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील बहुसंख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन व स्वागतांनी झाली. या कार्यक्रमासाठी निसर्ग कट्टा चे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल सावंत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या भाषणात सध्याच्या काळातील वन्यजीवांच्या अधिवासांचा होणारा र्हास यावर चिंता व्यक्त करून त्याचे संवर्धन कसे करता येईल व निसर्गकट्टा चे काटेपूर्णा अभयारण्यासाठी लाभलेली योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी वन्य जिवांच्या अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी आवाहन केले .त्यानंतर कार्यक्रमाचे कार्यकारी सचिव रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए बी पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व पाहुण्यांचा परिचय देऊन कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.मंचावर उपस्थित असलेले, कार्यक्रमाचे समन्वयक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ संतोष सुरडकर, यांनी वनस्पती व वन्य जीव याची जीवनशैली, अडचणी, अशा विविध गोष्टींवर प्रकाश टाकुन महाविद्यालयातील विद्यार्थिनींना निसर्ग आणि मनुष्य यांच्यात समतोल कसा साधता येईल याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकरराव पवार उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जंगलाचे महत्व विशद केले तसेच या दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा व विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती...अशाप्रकारचे गुलाम नबी आझाद महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा.डॉ. एन एम कंकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. जैन मॅडम तर आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागाचे प्रा शरद इढोळे यांनी केले. |